Advertisement

'कारवाईची नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा टाळे ठोकू', एसटी महामंडळाला भाजपाचा इशारा

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही.

'कारवाईची नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा टाळे ठोकू', एसटी महामंडळाला भाजपाचा इशारा
SHARES

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. शिवाय, एसटी सेवा बंद असल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईचा सामना करावा लागत आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावून संपात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं एसटी महामंडळानं कारवाईची नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळं ठोकू, असा इशारा भाजपनं दिला आहे.

'सोमवारी आम्ही राज्यभरात एसटी महामंडळाच्या आगारात टाळं ठोकण्याचं आंदोलन करणार होतो, पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं म्हणून हे आंदोलन केलं नाही. मात्र, जर सरकार जागं झालं नाही तर आम्ही ते आंदोलन करणार आहोत. शासनानं २ दिवसांत अभ्यास करून तत्काळ निर्णय घ्यावा. यासोबतच कारवाईची तत्काळ नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू.', असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

'संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. २००० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याच्या प्रसारमाध्यमावर खोट्या बातम्या पसरवून एसटीच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, पहिल्या दिवसापासून ज्या भावना आहेत, त्या आजही कायम आहेत. हे आंदोलन कोणत्या पक्षाचे नसून गोरगरीब मराठी कर्मचाऱ्यांचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानवरील आंदोलन सुरूच राहणार आहे', असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा