Advertisement

पॅकेजच्या पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही- उद्धव ठाकरे

हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण तुम्ही सुरू केलं तरी आम्ही नाही करणार, कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पॅकेजच्या पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही- उद्धव ठाकरे
SHARES

सध्या काही लोकांकडून पॅकेज जाहीर (stimulus package for maharashtra) करण्याची मागणी करण्यात येत आहे.  मात्र, आतापर्यंत अनेक पॅकेजच्या घोषणा करण्यात आल्या. केंद्रानेही पॅकेज दिलं. पण वरून छान दिसणारं पॅकेज उघडलं की आत रिकामा खोका दिसतो. पण महाविकास आघाडीचं (maha vikas aghadi government) सरकार पोकळ पॅकेजच्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करण्यावर भर देत असल्याचं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपला (bjp) टोला लगावला. 

आरोग्यविषयक सुविधा

उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी रविवार २४ मे २०२० रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या (covid-19) सद्यस्थितीचा आढावा घेतानाच भाजपकडून होत असलेल्या आर्थिक पॅकेजच्या मागणीचाही समाचार घेतला. ते म्हणाले, काही जणं असं म्हणत आहेत की तुम्ही पॅकेज का नाही दिलं? पॅकेज द्यायला पाहिजे. सगळं काही देत आहोत, पहिले जे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकट आहे. जोपर्यंत आरोग्यविषयक सुविधा आपण करत नाही तोपर्यंत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे.  

हेही वाचा - राज्य सरकारचं पॅकेज बघून डोळे पांढरे होतील, हसन मुश्रीफ यांचा भाजपला टोला

प्रत्यक्ष मदतीवर भर

जसं रेशन कार्ड नसलेल्यांना आपण धान्य देत आहोत, तसं रेशन कार्ड नसलेल्यांना उपचार कसे द्यायचे? म्हणून आपली महात्मा फुले योजना आहे, त्यात आपण १००% लोकांना नोंदणीकृत हॉस्पिटल्समध्ये १००% मोफत उपचार करून देणार आहोत. त्यामुळे केवळ वरून चांगलं पॅकिंग असलेलं पॅकेज देण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीवर आपला भर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारण करू नका  

हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण तुम्ही सुरू केलं तरी आम्ही नाही करणार, कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला हाणला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा