• तरूणीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी, संरक्षक जाळीमुळे वाचला जीव
SHARE

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मात्र संरक्षक जाळीमुळे या महिलेला कुठलीही दुखापत झाली नाही. ही तरूणी उल्हासनगर येथील राहणारी असल्याचं समजत आहे.


ही तरूणी मंत्रालयात काही कामानिमित्त आली होती. मात्र अचानक या महिलेने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र ही तरूणी पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला रुग्णालयात नेलं.

या तरुणीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. ही तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. परंतु, ती नेमक्या कोणत्या कारणानं अस्वस्थ होती, याबाबतचा पोलिस तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या