हाजी अली दर्ग्यात महिलांचा प्रवेश

  BDD Chawl
  हाजी अली दर्ग्यात महिलांचा प्रवेश
  मुंबई  -  

  वरळी - हाजी अली दर्ग्यात मंगळवारी ऐतिहासिक घटनेची नोंद झालीय. चार वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर महिलांनी दर्ग्यात प्रवेश केला. मंगळवारी मुस्लिम महिला आंदोलन समितीच्या सदस्यांनी हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत जाऊन दर्शन घेतलं. हाजी अली ट्रस्टकडून विरोधाची शक्यता लक्षात घेता मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.

   हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेशास असलेली बंदी उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं २६ ऑगस्टला दिला होता. भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेच्या झाकिया सोमण आणि नूरजहाँ नियाझ या महिलांनी जनहित याचिका केली होती. ती याचिका उच्च न्यायालयानं मान्य केली. त्यानंतर महिलांना मजारपर्यंत जाण्यास परवानगी मिळाली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.