आर दक्षिणमध्ये येणार महिलाराज


  • आर दक्षिणमध्ये येणार महिलाराज
  • आर दक्षिणमध्ये येणार महिलाराज
SHARE

कांदिवली - काल राज्य निवडणुकीच्या मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत आर दक्षिण विभागात महिलांना लॉटरी लागली आहे. पूर्वी 11 प्रभाग असलेला आर दक्षिण विभाग आता 13 प्रभागांचा झाला आहे. त्यात तब्बल 8 प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने आर दक्षिण विभागासाठी माहिलाराज येणार आहे.

प्रभाग रचना लोकसंख्येच्या प्रमाण आधारावर करण्यात आल्याने कांदिवली-चारकोप भागात दोन प्रभाग वाढले आहेत. आरक्षणात झालेले बदलामुळे सध्या पदावर असलेल्या बऱ्याच जणांना नवीन गणिते मांडावी लागणार आहेत. भर म्हणजे त्यात पक्षांची बेरीज वजाबाकी अजून रंगत आणणार आहे. अजंठा यादव यांनी महिलांना अधिक प्रमाणात मिळणाऱ्या प्रातिनिधित्वावर मुंबई लाईव्हशी बोलताना मात्र समाधान व्यक्त केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या