नोटबंदीविरोधात काँग्रेस महिला कार्यकर्त्या रस्त्यावर


  • नोटबंदीविरोधात काँग्रेस महिला कार्यकर्त्या रस्त्यावर
SHARE

मालाड - नोटबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी मोदी सरकारचा निषेध करत पोळपाट-लाटणं आंदोलन केलं. भाजपाच्या बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या मालाडच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. जवळपास 400 महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. उत्तर मुंबई महिला अध्यक्षा शीतल म्हात्रे आणि वॉर्ड क्रमांक 39 च्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार कुसुम सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं. या वेेळी महिलांनी भाजपाविरोधात नारे दिले. मोदी सरकारमुळे महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय. नोटबंदीमुळे ज्यांचा जीव गेला त्यांच्यासाठी मोदी सरकारने काय केलं,  असा संतप्त सवाल देखील या वेळी उपस्थित महिलांनी विचारला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या