वरळी (worli) हिट अँड रन (hit and run) प्रकरणी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला मंगळवारी विरार (virar) येथून अटक करण्यात आली. त्याला 10 जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
7 जुलै रोजी दुचाकीवर स्वार असलेल्या एका दाम्पत्याला बीएमडब्ल्यूने (BMW) धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती एका बाजूला पडली. महिला गाडीच्या बोनेटवर अडकली. बोनेटवर अडकलेल्या महिलेला कार चालकाने सुमारे एक ते दीड किमीपर्यंत ओढले. तसेच, कार तिच्या अंगावरून गेली. त्यात महिलेचा मृत्यू झाला तर तिचा नवरा जखमी झाली. या क्रूर घटनेनंतर या गाडीचा चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह ज्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, तोही घटनेनंतर फरार झाला होता. अपघातानंतर तो प्रथम प्रेयसीकडे गेला. नंतर बोरिवली येथील निवासस्थानी आणि नंतर कुटुंबासह ठाणे-शहापूर येथील रिसॉर्टमध्ये गेला. त्यानंतर कुटुंबीयांना फसवून तो मित्रांसह विरार येथील एका रिसॉर्टमध्ये गेला.
दरम्यान, या काळात सर्वांचे फोन बंद होते. त्यामुळे पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र, त्याच्या मित्राने पंधरा मिनिटांनी मिहीरला फोन लावल्याने त्याचा पत्ता मिळाला. त्यांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची आई आणि दोन बहिणींना ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
त्याला 10 जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि मिहिरच्या वकिलात बाचाबाची झाली. सरकारी वकिलांनी मिहिरला पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली होती. पण मिहीरच्या वकिलांनी मिहीरची सर्व चौकशी पूर्ण झाली असल्याने त्याला आता कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.
पोलिसांनी युक्तिवादात काय म्हटले?
मिहिरला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. या प्रकरणात मिहिरला ज्यांनी मदत केली त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. आरोपींकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का याचा तपास करायचा आहे, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
काय म्हणाले आरोपीचे वकील?
याचा प्रतिकार करण्यासाठी मिहीरच्या वकिलाने सांगितले की, कार चालक आणि मिहीर यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. त्याचा फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. मग आता त्यांना मिहीरची कस्टडी कशाला हवी आहे? आरोपीलाही घटनास्थळी नेण्यात आले. त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. ड्रायव्हर आणि मिहीरचे उत्तर जुळले आहे. त्यामुळे मिहीरला ताब्यात घेण्याचे पोलिसांकडे सबळ कारण नाही.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मिहिरला 16 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी (custody) सुनावली.हेही वाचा