...तर सेनेचं झंझट राहीलं नसत - चंद्रकांत पाटील


SHARE

चिंचपोकळी - भाजपाला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 123 जागा निवडून दिल्या. मात्र आणखी 20 जागा निवडून दिल्या असत्या तर शिवसेनेचं झंझटच राहीलं नसतं, अशी टीका महाराष्ट्रातील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ना. म. जोशी मार्ग येथील मोघल हाऊस मैदानात शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला भाजपाच्या वॉर्ड क्र. 199 च्या उमेदवार आरती पुगावकर, वॉर्ड क्र 200 च्या उमेदवार जोत्सना धुमाळ पवार उपस्थित होते. मात्र या सभेत मोठ्या प्रमाणात अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या.

20 वर्ष सत्तेत राहून देखील शिवसेनेनं काहीच काम केलं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तर रेल्वेची देखील मोठी समस्या आहे. मुंबईची ही स्थिती बदलायची असेल तर भाजपाला मत द्या असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या