Advertisement

योगी सर्वात निर्दयी मुख्यमंत्री, काँग्रेसची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेते योगींच्या बेताल वक्तव्यावर तुटून पडत आहेत.

योगी सर्वात निर्दयी मुख्यमंत्री, काँग्रेसची टीका
SHARES

महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस सरकारने (shiv sena congress government) परप्रांतीय मजुरांची फसवणूक केली, असा आरोप करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (congress spokesperson sachin sawant) यांनी तितक्याच तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेते योगींच्या बेताल वक्तव्यावर तुटून पडत आहेत. 

मजुरांची फसवणूक

योगी आदित्यनाथ (up cm yogi aaditynath) सध्या उत्तर प्रदेशातील मजुरांच्या मुद्द्यावरून सातत्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas government) दोषारोप करत आहेत. आपल्या घामाने आणि रक्ताने महाराष्ट्राला घडवणाऱ्या परप्रांतीय कामगारांची (migrant workers) शिवसेना-काँग्रेसच्या सरकारने फसवणूक केली. लाॅकडाऊनच्या (lockdown) काळात त्यांना त्यांच्या अवस्थेवर सोडून देण्यात आलं आणि राज्याबाहेर निघून जाण्यास प्रवृत्त केलं. या अमानवीय वागणुकीसाठी परप्रांतीय मजूर उद्धव ठाकरे यांना कधीच माफ करणार नाही. असं वक्तव्य योगींनी केलं आहे. 

हेही वाचा - तर महाराष्ट्रात येण्याआधी, 'हे'सुद्धा लक्षात ठेवा… राज ठाकरेंचं योगींना सडेतोड प्रत्युत्तर

परवानगी आवश्यक

सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने कामगार परतत आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबाबतची सर्व माहिती गोळा करून त्यांना सोईसुविधा देण्यासाठी यूपी सरकारने मायग्रेशन कमिशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे होम क्वारंटाईन होणाऱ्या कामगारांना १ हजार रुपयांचा भत्ता देण्यात येईल. त्यांना सामाजिक सुरक्षेची हमी देतानाच रोजगाराचा प्रश्नही सोडवण्यात येईल. त्यामुळे यापुढे कुठल्या राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर त्यासाठी यूपी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं योगी म्हणाले होते. 

निर्दयी मुख्यमंत्री

त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, परप्रांतीय मजूर हे सर्वप्रथम मनुष्य आहेत आणि या देशाचे नागरिकसुद्धा. या देशात कुठल्याही ठिकाणी काम करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज लागत नाही. योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात अकार्यक्षण आणि निर्दयी मुख्यमंत्री आहेत. जे स्वत:च्या राज्यातील नागरिकांनाच एखाद्या दुष्मनाप्रमाणे वागवत आहेत. 

लोकांची काळजी घ्या 

उत्तर प्रदेशचा विकास करण्याचं धाडस किंवा दूरदृष्टी त्यांच्यात नाही, जेणेकरून यूपीतल्या व्यक्तीला रोजगारासाठी इतर राज्यात जाण्याची गरज उरणार नाही. फक्त फुकाचं राजकारण करण्यातच ते धन्यता मानतात. उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून आलेल्या त्यांच्याच राज्यातील लोकांची आता नीट काळजी घ्यावी, अशी मागणी आता आम्ही त्यांच्याकडे करत आहोत.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा