Advertisement

योगी आदित्यनाथ मुंबईत येणार, उद्योगपती, सेलिब्रिटींना भेटणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येण्यास सज्ज झाले आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.

योगी आदित्यनाथ मुंबईत येणार, उद्योगपती, सेलिब्रिटींना भेटणार
SHARES

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येण्यास सज्ज झाले आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून या दौऱ्यात ते मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींना भेटणार आहेत. 

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून योगी आदित्यनाथ यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. या दौऱ्यासाठी योगी १ डिसेंबर रोजी रात्रीच मुंबईत दाखल होतील असं म्हटलं जात आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी योगी मुंबई शेअर बाजारा (बीएसई)ला भेट देऊन तिथं एका छोटेखानी सोहळ्यात लखनऊ महापालिके(LMC)च्या पहिल्यावहिल्या बाँडचं अनावरण करतील. लखनऊ महापालिकेने शहराचं सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता इ. कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बाँड जारी केला आहे. या बाँडला गुंतवणूकदारांची जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बाँड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजिायाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर इ. शहरांसाठी देखील बाँड काढण्याची योजना आखू शकते.

आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ उद्योजक-बँकर्स आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींसोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन करतील. 

योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अॅण्ड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी इ. उद्योजकांना भेटतील. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही ते भेट घेतील.

तर, सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, राहुल मित्ता, नीरज पाठक, रणदिप हुडा, तिग्मान्शू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नहाटा, राजकुमार संतोषी इ. बाॅलिवूडमधील अभिनेते, निर्मात्यांना देखील भेटतील. नोएडामध्ये एक भव्यदिव्य फिल्म सिटी उभारण्याची योगी आदित्यनाथ यांची महत्त्वाकांक्षा आहे. या ठिकाणी सिंगल विंडोच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन याेगींनी दिलं.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा