चांगले उमेदवार बदलतील निवडणुकीचं गणित?

  Fort
  चांगले उमेदवार बदलतील निवडणुकीचं गणित?
  मुंबई  -  

  सीएसटी - 84 टक्के मतदारांना उमेदवार 40 वर्षांपेक्षा कमी वयाचा आणि सुशिक्षित असावा असं वाटत असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्सनं निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून मतदारांचं सर्वेक्षण केलं. विशेषतः उमेदवारांविषयी अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. त्यात ही बाब उघड झालीय. 

  हे सर्वेक्षण 16 महानगरपालिका, नगरपंचायतींतून करण्यात आलं. दीड वर्षापासून राज्य निवडणूक आयोगासोबत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स निवडणुकांविषयी अभ्यास करत आहे. या अभ्यासातून जमवलेली माहिती मतदारांपर्यंत पोहचावी, यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. इन्स्टिट्युटच्या मानसी फडके यांनी या परिषदेत ही माहिती दिली. नगरपालिका मतदाराला उमेद्वाराबद्दल काय वाटतं आणि महापालिकांमध्ये मतदानाचं प्रमाण कमी का असतं, या दोन प्रमुख मुद्दयांवर हे सर्वेक्षण घेण्यात आलं.
  का होतं कमी मतदान?
  -मतदार यादीत नाव नसणं
  -उमेद्वारांचा दर्जा योग्य नसणं
  महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबतची नाराजी
  का केलं जातं मतदान?
  उमेदवार खूपच चांगला आहे. पुन्हा तो निवडून येण्यासाठी मतदान केलं जातं.
  एकूणच, उमेदवाराच्या गुणवत्तेवर निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. राजकीय पक्षांनी चांगले उमेदवार दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते, असं मानसी फडके यांनी या वेळी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.