मतदान करा, सवलत मिळावा ऑफरला भरघोस प्रतिसाद

  मुंबई  -  

  दादर - मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी वेगवेगळे पर्याय शोधून काढले. त्यात कोणी हेअर स्टाईलवर सूट दिली, तर कोणी हॉटेलमधील बिलावर. नॅशनल हेअर क्राफ्टच्या वतीने राबवण्यात आलेल्या बोटावरची शाई दाखवा आणि हेअरस्टाईलवर 15 टक्के सूट मिळवा या उपक्रमामुळे चांगलाच फायदा झाला.

  तरुण-तरुणींनी हातावरची शाई दाखवत तुषार चव्हाण यांनी दिलेल्या ऑफरचा फायदा घेतला. खरं तर मतदान हा आपला हक्क आहे. तो बजावण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑफरची गरज नाही. पण, त्यातही टाळाटाळ करणाऱ्यांना घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडायला या ऑफरमुळे खरंच मदत झाल्याचं दिसून आलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.