बोल मुंबई: नोटबंदीमुळं सरकारला नुकसान होणार ? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ


SHARE

विरोधी पक्षांकडून वेळोवेळी जे मुद्दे उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यामध्ये नोटबंदी हा एक मुद्दा आहे. नोटबंदी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतात. तर दुसरीकडे काळा पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदी उपयुक्त ठरली असं सरकारचं म्हणणं आहे. याच मुद्यावर तरूणांच्या प्रतिक्रिया मुंबई लाइव्हने घेतल्या. यावेळी तरूणांनी नोटाबंदी हे एक चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. 


तरूण मतदारांचं म्हणणं आहे की, नोटबंदीमुळे कुणाला त्रास नाही झाला. त्रास झाला असता तर हे माहित झालं असतं.मात्र, याबद्दल कोणी काहीच बोललं नाही.  दुसऱ्या एका मतदारानं म्हटलं की, नोटबंदीमुळे त्रास झाला. मात्र हा त्रास फार मोठा नव्हता. त्यामुळे सरकारला याचा काहीच फरक पडणार नाही. 

नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला असेल किंवा नसेल, मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सरकारवर याचा किती परिणाम होईल हे २३ मे नंतरच समजेल. हेही वाचा -

बोल मुंबई: राफेल सौदा भाजपाच्या अडचणीचा? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ
संबंधित विषय
ताज्या बातम्या