Advertisement

बोल मुंबई: राफेल सौदा भाजपाच्या अडचणीचा? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ

राफेलच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर युवा मतदारांमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. राफेल घोटाळा हा केवळ विरोधकांनी लावून धरलेला मुद्दा असल्याचं मत काहींनी मांडलं, तर काही जणांनी याप्रकरणी खरोखरच गांभीर्याने चौकशी होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. बघा या युवकांनी काय म्हटलंय.

बोल मुंबई: राफेल सौदा भाजपाच्या अडचणीचा? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ
SHARES

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हणत काँग्रेस सातत्याने भाजपा आणि प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भाजपाला लक्ष्य करत आहेत. राफेलचा हा मुद्दा खरोखरच मोदी सरकारला अडचणीचा ठरू शकतो का? यावर मुंबई लाइव्हने युवा मतदारांची मतं जाणून घेतली.

राफेलच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर युवा मतदारांमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.
राफेल घोटाळा हा केवळ विरोधकांनी लावून धरलेला मुद्दा असल्याचं मत काहींनी मांडलं, तर काही जणांनी याप्रकरणी खरोखरच गांभीर्याने चौकशी होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. बघा या युवकांनी काय म्हटलंय.


लोकशाहीच्या या महोत्सवात युवकांच्या मतांचं मूल्य मोठं आहे. त्यामुळेच मुंबई लाइव्हने या युवा मतदारांशी संबंध साधून त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. राफेलचा मुद्दाही त्यापैकीच एक. आपलं बहुमूल्य मत देण्याआधी हे मतदार देशातील प्रत्येक राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. हेही यातून दिसून येतंय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय