Advertisement

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल झाली तेव्हापासूनच अॅड. पाटील आणि अॅड. सदावर्ते यांना धमक्या येण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत हजाराच्यावर धमक्या आल्या असून याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात अॅड. सदावर्ते यांनी गुन्हाही दाखल केला आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला
SHARES

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला झाला. याचिकेवरील सुनावणीसंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांना देत आपल्या कार्यालयात परतत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या व्यक्तीला आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं या हल्ल्याची दखल घेत अॅड. सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तात्काळ पोलिस सुरक्षा द्यावी असे आदेश दिले आहेत.


हजाराच्यावर धमक्या

मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल झाली तेव्हापासूनच अॅड. पाटील आणि अॅड. सदावर्ते यांना धमक्या येण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत हजाराच्यावर धमक्या आल्या असून याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात अॅड. सदावर्ते यांनी गुन्हाही दाखल केला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडूनही धमकी अाली असल्याची माहिती अॅड. सदावर्ते यांनी दिली अाहे. सोमवारी सुनावणीदरम्यान अॅड. सदावर्ते यांनी यासंबंधीची माहिती न्यायमूर्ती नरेश पाटील यांना दिली होती. 


हल्ला करणारा जालन्याचा

सोमवारी सुनावणी संपल्यानंतर अॅड. सदावर्ते प्रसारमाध्यमांना माहिती देऊन आपल्या कार्यालयात जात असताना अचानक एक व्यक्ती एक मराठा लाख मराठा म्हणत आली आणि या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या तोंडावर बुक्के मारले आणि आरक्षणाविरोधात याचिका का दाखल केली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर अॅड. सदावर्ते यांच्यासोबत असलेल्या वकीलांनी त्या व्यक्तीला चोप दिला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव वैद्यनाथ पाटील असं असून ही व्यक्ती जालन्याची रहिवाशी असल्याचं समजत आहे.



हेही वाचा - 

मेगाभरतीच्या जाहिरातीची घाई का? न्यायालयानं सरकारला फटकारलं

होय, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं प्लानिंग पाकिस्तानमध्ये झालं, पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं कबूल





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा