युवासेनेचा 'केजी टू पीजी' महामोर्चा

Dadar
युवासेनेचा 'केजी टू पीजी' महामोर्चा
युवासेनेचा 'केजी टू पीजी' महामोर्चा
See all
मुंबई  -  

दादर - शिक्षण क्षेत्रात चाललेल्या गोंधळाविरोधात युवासेनेकडून शनिवारी 'केजी ते पीजी' महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा गिरगाव, नाना-नानी पार्क पासून मारिन लाईन्स पर्यंत काढण्यात येणार असून, युवासेनेचे प्रमुख 'आदित्य ठाकरे' स्वतः उपस्थित राहून महामोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

या मोर्चाच्या स्वरूपाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी दादरमधील प्रीतम ढाबा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमोल कीर्तिकर, सुरज चौहान , वरुण सरदेसाई (युवा नेते) त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते. 'शिक्षण क्षेत्रात चाललेला गोंधळ, शिक्षणाची वाढती फी, मुलांना झालेले दप्तराचे ओझे, ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 'केजी ते पीजी' मधून मांडण्यात आले आहेत. तसेच शनिवारी होणाऱ्या महामोर्च्यात असंख्य विद्यार्थी तसेच पालकवर्ग सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 'युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारा हा मोर्चा यशस्वी होईल', असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.