पंतप्रधान आवास योजनेचा कालावधी आता वाढवण्यात आला आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजनेला मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या योजनेला मुदतवाढ दिल्याने जवळपास २.५ लाख नागरिकांना याचा लाभ
होणार
आहे. या निर्णयाने बांधकाम साहित्याची मागणी वाढेल आणि बांधकाम क्षेत्रात किमान ७० हजार कोटींची गुंतवणूक आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
पंतप्रधान आवास योजनेची सुरूवात सरकारने 2017 मध्ये केली. ही योजना मार्च २०२० मध्ये बंद झाली. आता सरकारने या योजनेची मुदत वाढवली आहे. ६ ते १८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घर घेण्यासाठी या योजना फायदा होतो. या योजनेचा आतापर्यंत ३.३ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे.
शहरातील गरीबांना या योजनेद्वारे घर दिले जाते. मध्यम उत्पन्न असणाऱ्यांचे दोन गट करण्यात आल्या आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ ते १२ लाख आहे ते पहिल्या गटात तर १२ ते १८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांचा दुसरा गट आहे. या योजनेच्या क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीमनुसार दोन्ही गटातील लाभधारकांना व्याज अनुदान मिळते. पहिल्या गटातील लाभधारक ९ लाखापर्यंत गृहकर्जावर व्याज अनुदानाचा फायदा घेऊ शकतात. यावर व्याज अनुदान ४ टक्के आहे आणि २० वर्षांच्या गृहकर्जाच्या कालावधीवर दिले जाते. दुसऱ्या गटात १२ ते १८ लाखांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश आहे. २० वर्षांच्या गृहकर्जावर ३ टक्के व्याज अनुदान दिले जाते.
महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता
पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक