Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईकरांना दिलासा! रेडीरेकनरचे दर 'जैसे थे'

रेडीरेकनरमध्ये दरवाढीचे संकेत मिळताच राजकीय पक्षांसह मालमत्ता क्षेत्रातील संघटनांनी दरवाढ करू नये, अशी मागणी उचलून धरत लेखी निवेदन दिल्याने यंदा कोणतीही दरवाढ करण्यात आली नसल्याचं समजत आहे.

मुंबईकरांना दिलासा! रेडीरेकनरचे दर 'जैसे थे'
SHARES

मालमत्ता बाजारपेठेतील मंदी आणि मालमत्तांचे स्थिर दर लक्षात घेता यंदा रेडीरेकनरचे दर थोडेफार कमी होतील अशी, आशा मालमत्ता बाजारपेठेला होती. पण ही आशा आता फोल ठरली आहे. कारण रेडीरेकनरच्या दरात कोणतीही कपात न करता मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाने दर 'जैसे थे' ठेवले आहेत. त्यामुळे मालमत्ता बाजारपेठेत सध्या थोडी खुशी थोडा गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.


मागणीची दखल

१ एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या रेडीरेकनरच्या दरात ३ ते ५ टक्क्यांची वाढ होईल, असे संकेत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाने १५ दिवसांपूर्वी दिले होते. तर विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ करण्यात आली होती. मात्र दरवाढीचे संकेत मिळताच राजकीय पक्षांसह मालमत्ता क्षेत्रातील संघटनांनी दरवाढ करू नये, अशी मागणी उचलून धरत लेखी निवेदन दिल्याने यंदा कोणतीही दरवाढ करण्यात आली नसल्याचं समजत आहे.


बिल्डरांकडून नाराजी

शनिवारी मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाकडून एक आदेश काढण्यात आला असून या आदेशानुसार रेडीरेकनर दर 'जैसे थे' ठेवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडीया (बीएआय) नं दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाचं स्वागत करतानाच नाराजीही व्यक्त केली.


कृत्रिम दरवाढ नको

गेल्या तीन-चार वर्षात मालमत्ता बाजारपेठेत मंदीचं वातावरण असताना, मालमत्तांचे दर कमी होत असताना रेडीरेकनरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. राज्य सरकार केवळ आपला महसूल वाढवण्यासाठीच कृत्रिम दरवाढ करत असल्याची प्रतिक्रिया बीएआयचे पदाधिकारी आनंद गुप्ता यांनी दिली.हेही वाचा-

एमसीएचआय-क्रेडायनं उचलला परवडणाऱ्या घरांचा 'विडा', मुंबईत बांधणार अडीच लाख घरं

'हा' आहे मुंबईतला सगळ्यात महागडा फ्लॅटRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा