SHARE

मुंबई - भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या लवासा प्रकल्पावर लोकलेखा समितीने ताशेरे ओढले आहेत. राज्याच्या नगरविकास विभागाने पुणे जिल्ह्यातल्या लवासा प्रकल्पाला मंजुरी देण्याचा निर्णय फक्त प्रकल्प विकासकाचे हित लक्षात ठेवून घेतला, असे ताशेरे लोकलेखा समितीने सोळाव्या अहवालात ओढले आहेत.

तसेच या प्रकल्पामुळे होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेता मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची आवश्यकता होती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या 25 सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल आहेत. त्यांनी हा अहवाल शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. त्यामध्ये लवासासहित पुणे जिल्ह्यातील अन्य पाच थंड हवेच्या ठिकाणांबाबत काम करताना झालेल्या अनियमिततेबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या