Advertisement

सहार गावठाणचे गावकरी हैराण


सहार गावठाणचे गावकरी हैराण
SHARES

सहार गावठाण - सहार गावामधील सुतारी पाखाडी, टँक पाखाडी आणि अवर लेडी ऑफ हेल्थ या तीन गावठाणाचे गावकरी सर्व्हेक्षणाच्या नोटिशीने हवालदील झाले आहेत. हे सर्व्हेक्षण नेमके कशासाठी आहे हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न जीवीके आणि संबंधित सरकारी यंत्रणांकडून होत असला तरी हे सर्व्हेक्षण गावठाणांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठीच असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

2007 मध्ये जीवीकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावठाणाच्या जमिनी संपादित करण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्वरीत हा अर्ज आणि जमीन संपादनासंबंधीचा अध्यादेश जारी करावा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे.

5 जानेवारी 2007 रोजी जीवीकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विमानतळ विस्तारीकरणासाठी गावठाणातील खासगी जमीन संपादित करण्यासाठी अर्ज केला होता. सरकारी प्रकल्पासाठीच्या जमीन संपादनासाठीच्या 2006 च्या एका अध्यादेशाचा संदर्भही यासाठी दिला होता. मात्र, त्यावेळी गावकऱ्यांनी जनआंदोलन छेडत जीवीकेचा डाव हाणून पाडला. त्यानंतर एमएमआरडीएच्या मास्टर प्लॅनमधून गावठाणाच्या जमिनी वगळण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पण, आता मार्च 2017 मध्ये सर्व्हेक्षणासाठी नोटिसा पाठवण्यात आल्याने गावठाण ताब्यात घेण्याचाच हा डाव असल्याचा आरोप माजी नगरसेवक निकोलस आल्मेडा यांनी केला आहे. तर हा अर्ज आणि संबंधित अध्यादेश त्वरीत जारी करण्याची मागणी लवकरच सरकारकडे केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत गावठाणाची एक इंच जागाही जीवीकेला देणार नाही, असा निर्धारही गावकऱ्यांनी केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा