Advertisement

गुजरात निवडणूक इफेक्ट: सेन्सेक्समध्ये ९४१ अंकांची रिकव्हरी


गुजरात निवडणूक इफेक्ट: सेन्सेक्समध्ये ९४१ अंकांची रिकव्हरी
SHARES

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येताच शेअर बाजाराने पुन्हा एकदा अपेक्षेनुसार उसळी खाल्ली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी १३८ अंकांनी वाढून ३३,६०१ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५५ अंकांनी वाढून १०,३८८ वर स्थिरावला.


घसरण अन् पुन्हा तेजी

सोमवारी सकाळी शेअर बाजार खुलताच सेन्सेक्स तब्बल ८०३ अंकांनी कोसळला. अनपेक्षित निकालाच्या भीतीमुळे चौफेर विक्री झाल्याने सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. पण जसजसे निकालाचे आकडे समोर यायला लागले, तसतसा सेन्सेक्स वधारू लागला. दिवभरात सेन्सेक्सने तब्बल ९४१ अंकांची रिकव्हरी करत १३८ अंकांची वाढ नोंदवली.


गुजरातमधील कंपन्यांना धक्का

सकाळच्या सुमारास गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल काय असतील, याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ६ टक्क्यांपर्यंत घसरले. सोबतच अदानी इंटरप्रायझेस (४.३६ टक्के), अदानी पोर्ट (१.४८ टक्के), अदानी पाॅवर (४.२६ टक्के), अदानी ट्रान्समिशन (२.७७ टक्के), अरविंद लिमिटेड (१.३२ टक्के), टोरंट पाॅवर (१.६७ टक्के) आणि गुजरात स्टेट पेट्रोनेट (०.२९ टक्के) या गुजरातमधील कंपन्यांचे शेअर्सही घसरले. मात्र दिवसअखेर या कंपन्यांच्या शेअर्सनीही काही प्रमाणात रिकव्हरी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा