Advertisement

नव्या वर्षाची जबरदस्त सुरुवात; मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सेन्सेक्स-निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करण्यात आलेल्या मुहूर्त ट्रेडिंगच्या खरेदीमुळे शेअर बाजारात जबरदस्त उसळी दिसून आली.

नव्या वर्षाची जबरदस्त सुरुवात; मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सेन्सेक्स-निफ्टीचा नवा उच्चांक
SHARES

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करण्यात आलेल्या मुहूर्त ट्रेडिंगच्या खरेदीमुळे शेअर बाजारात जबरदस्त उसळी दिसून आली. सायंकाळी मुहूर्त ट्रेंडिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स ३८१ अंकांनी उसळून ४३८२३.७६ या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील ११७.८५ अंकांनी वधारून १२८०८.६५ या आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणाऱ्या वेळेनुसार, ही वेळ ठरवली जाते. सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद ठेवण्यात येतात. मात्र शनिवार असूनही मुहूर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी शेअर बाजार काही काळ उघडण्यात आला. १९५७ पासून बीएसई, तर १९९२ पासून एनएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगच्या आयोजनाला सुरूवात झाली.

हेही वाचा- दिवाळीतील ट्रेडिंग सेशनच्या मुहूर्ताचं महत्त्व

संवत वर्ष २०७७ च्या सुरुवातीला लक्ष्मी पूजनाच्या विशेष मुहूर्तावर संध्याकाळी ६.१५ वाजता घंटा वाजवून मुहूर्ताच्या सौद्यांना शेअर बाजारात सुरुवात झाली. अभिनेत्रा अथिया शेट्टी हिच्या उपस्थित लक्ष्मी पूजन करण्यात आलं.

सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच शेअर बाजाराचा निर्देशांक ३८०.७६ अंकांनी वधावरून ४३८२३.७६ च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. तसंच निफ्टीसुद्धा ११७.८५ अंकांसह १२८०८.६५ या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर होते. ज्यात एफचडीएफसी, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचसीएसल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचयूएल, बजाज ऑटो, मारुती, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. टेलिकॉम, औद्योगिक आणि वित्तक्षेत्रासह जवळ जवळ सर्व क्षेत्रातील निर्देशांक फायद्याच्या चिन्हांमध्ये होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा