Advertisement

सेन्सेक्सच्या तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक


सेन्सेक्सच्या तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक
SHARES

देशांतर्गत शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या विक्रमी तेजीला गुरूवारी दिवसअखेर ब्रेक लागला. चांगला परतावा मिळवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीवर भर दिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीत घट नोंदवण्यात आली. दिवसअखेर सेन्सेक्स 224 अंकांनी घसरून 30,435 अंकांवर आला. तर निफ्टी 96 अंकांनी घटून 9429 वर स्थिरावरला. आयटी इंडेक्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील इंडेक्समध्ये दिवसभरात घसरण नोंदवण्यात आली.

या कारणांमुळे घसरला सेन्सेक्स -
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआय संचालक यांना पदावरून दूर केल्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
- त्याचा परिणाम आशियासहित सर्व देशांतील बाजारपेठांवर झाला.
- गुरूवारी आशियातील बाजारावर स्पष्ट दबाव दिसून येत होता. त्यामुळे येथेही घसरण झाली. - देशांतर्गत पातळीवर रुपयात झालेली घसरण, जीएसटी दरांमधील गोंधळ आणि चौथ्या तिमाही निकालांनी भारतीय बाजारपेठेवर दबाव निर्माण झाला.
- त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेणे पसंत केले.
- रुपया 19 पैशांच्या घसरणीसह उघडला. हा रुपयाचा मागील एक आठवड्याचा निचांक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा