Advertisement

सेन्सेक्स २५३ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले


सेन्सेक्स २५३ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले
SHARES

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल २५३ अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचं किमान २ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. ही सलग पाचव्या सत्रात झालेली घसरण आहे. यामुळे सेन्सेक्स २५३ अंकांनी घसरून ३२,९२३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०१ अंकांनी घसरून १०,०९४ वर बंद झाला.


३ महिन्यांतील नीच्चांकी

शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्यामुळे सोमवारी ही घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे शेअर बाजारात ३ महिन्यांच्या निच्चांकापर्यंत आला आहे. मुख्यत्वेकरून या विक्रीचा फटका मीडकॅप आणि स्माॅलकॅप इंडेक्सला बसला. परिणामी बीएसईचा मीडकॅप इंडेक्स ०.६३ टक्के आणि स्माॅलकॅप इंडेक्स ०.२१ टक्क्यांची घसरण झाली.


कुठे, किती घसरण?

एफएमसीजी सेक्टर वगळता सर्व सेक्टरमध्ये जोरदार घसरण झाली. यांत सर्वाधिक घसरण रियाल्टी इंडेक्समध्ये झाली. रियाल्टी इंडेक्समध्ये २.९४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर मेटल इंडेक्समध्ये २.६ टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये २.६३, आयटी इंडेक्समध्ये २.१८ टक्के, बँक इंडेक्समध्ये १ टक्क्यांची घसरण झाली.


किती रुपयांचं नुकसान?

शुक्रवारी बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांची एकूण मार्केट कॅप १,४३,१७,३०७.६५ कोटी रुपये होती. त्यात घसरण होऊन ही मार्केट कॅप सोमवारी दुपारी २,०६,६२३.६५ कोटी रुपयांनी घटून १,४१,१०,६८४ कोटी रुपयांवर आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा