Advertisement

सेन्सेक्सची ३५२ अंकांची झेप, निफ्टीही १० हजारांच्या पलिकडे


सेन्सेक्सची ३५२ अंकांची झेप, निफ्टीही १० हजारांच्या पलिकडे
SHARES

रियाल्टी, बँकिंग, मेटल आणि आटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने गुरूवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ३५२ अंकांची वाढ नोंदवून ३२,९४९.४९ वर झेप घेतली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १२२.६० अंकांची वाढ नोंदवून १०१६६.७० वर मजल मारली.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी द्विमासिक पतधोरण जाहीर करताना केंद्र सरकार लवकरच ‘रिकॅपिटलायझेशन’ प्लान सादर करेल, असं म्हटलं होतं. ‘रिकॅपिटलायझेशन’ प्लानच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

त्यांच्या वक्तव्यामुळे पीएसयू बँकिंग क्षेत्राचा इंडेक्स १.३४ टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी मेटल इंडेक्समध्ये १.८५ टक्के, निफ्टी रियाल्टी इंडेक्समध्ये १.९० टक्के, निफ्टी एफएमसीजी इंडेक्समध्ये १ टक्का आणि निफ्टी आटो इंडेक्समध्ये सर्वाधिक २ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा