शेअर बाजारात तेजीचे वातावरण

  Kala Ghoda
  शेअर बाजारात तेजीचे वातावरण
  मुंबई  -  

  गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात नफाखोरीमुळे आलेल्या विक्रीच्या लाटेत गटांगळी खाणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी सकाळी कामकाजाला सुरूवात होताच तेजीच्या दिशेने कूच करू लागला आहे. राष्ट्रीय शेअर निर्देशांकातही तेजीने सुरुवात झाली आहे.

  सोमवारी कामकाजाला सुरूवात होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने 90 अंकांची उसळी घेतली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर निर्देशांकातही तेजीने वाढ झालेली दिसून आली. यामुळे राष्ट्रीय शेअर निर्देशांकांने पुन्हा एकदा 3900 ची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे सोने आणि चांदीसह क्रूड तेलामध्येही तेजीनेच सुरुवात झाली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.