Advertisement

सेन्सेक्सची विक्रमी झेप, पोहोचला ३३,६०० अंकांवर


सेन्सेक्सची विक्रमी झेप, पोहोचला ३३,६०० अंकांवर
SHARES

‘ईज आॅफ डुईंग बिझनेस’मध्ये भारताच्या रँकिंगमध्ये झालेली सुधारणा आणि ग्लोबल पॅझिटीव्ह संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८७ अंकांची झेप घेऊन विक्रमी ३३,६०० अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही १०५ अंकांची वाढ नोंदवत पहिल्यांदाच १०,४०० अंकांची पातळी गाठली आहे.


पुन्हा रेकाॅर्डब्रेक कामगिरी

बुधवारी शेअर बाजारातील व्यवहारांना सुरूवात होताच सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी, मेटल आणि रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने ३३६५१.५२ वर झेप घेतली. तर निफ्टीही १०,४५१.६५ वर पोहोचला. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्सने ३३,३४०.१७ आणि निफ्टीने १०,३८४.५० पर्यंत मजल मारली होती. पण, मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाल्याने सेन्सेक्स ३३,२५२.१५ आणि निफ्टी १०,३६७. वर पोहोचला.


का वधारला सेन्सेक्स?

वर्ल्ड बँकेने सादर केलेल्या अहवालात ‘ईज आॅफ डुईंग’मध्ये भारत १३० व्या स्थानावरून १०० व्या स्थानावर पोहोचल्याने देशांतर्गत बाजारातील संकेत सकारात्मक झाले. सोबतच सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या शेअर्सची खरेदी वाढल्याने त्याचाही हातभार शेअर बाजाराला लागला. निफ्टी पीएसयू इंडेक्स सर्वाधिक ३.६४ टक्क्यांनी वाढला. त्याशिवाय निफ्टी एफएमसीजी इंडेक्स १.५४ टक्के, निफ्टी फायनांन्स सर्व्हिस १.९७ टक्के, निफ्टी मेटल १.८० टक्के, खासगी बँक १.६९, तर रियाल्टी इंडेक्स २.७६ टक्क्यांवर पोहोचला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा