काही क्षणात ५ लाख कोटी गमावले, शेअर बाजारात घसरण सुरूच

मागील काही दिवसांपासून चालू असलेली मोठी पडझड थांबण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. गुरूवारीही देशातील शेअर बाजार कोसळले.

काही क्षणात ५ लाख कोटी गमावले, शेअर बाजारात घसरण सुरूच
SHARES

कोरोनाची विषाणूच्या भितीचा फटका शेअर बाजाराला बसणं चालूच आहे. मागील काही दिवसांपासून चालू असलेली मोठी पडझड थांबण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. गुरूवारीही देशातील शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स उघडताच 1700 अंकांनी कोसळून 27 हजार 92 अंंकांवर उघडला. तर निफ्टीही 500 अंकांनी कोसळला. या पडझडीत गुंतवणूकदारांना काही क्षणात 5 लाख कोटींचा फटका बसला.

शेअर बाजारात सर्वच शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरु आहे. सेन्सेक्समधील सर्वच ३० शेअर्स घसरले आहेत. आयटीसी, इन्फोसिस, सन फार्मा, बजाज ऑटो, एलअँडटी , रिलायन्स, एचयूएल, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, टायटन या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. स्मॉल कॅप निर्देशांकात प्रचंड घसरण झाली. तो ५ वर्षांच्या नीचांकावर आला आहे.

करोना आजारानं जगभरातील देशांसमोर नवं संकट उभं केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलावरही करोनाचा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड कायम आहे.
चलन बाजारात रुपयात मोठे अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ६७ पैशांनी घसरला असून तो ७४.९० वर ट्रेड करत आहे. आशियातील प्रमुख शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. अमेरिकेत शेअर निर्देशांक ६ टक्के घसरले. त्याचा परिणाम आज भारतीय बाजारांवर दिसून आला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून त्यांनी पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे.

बुधवारी सेन्सेक्स गेल्या तीन वर्षांत प्रथमच २९,०००च्या पातळीखाली गेला. १७०९.५८ अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स २८,८६९.५१ वर बंद झाला. निफ्टी ४२५.५५ अंकांनी घसरून ८,५४१.५०च्या पातळीवर स्थिरावला होता.

संबंधित विषय