Advertisement

म्हणून गडगडला सेन्सेक्स


म्हणून गडगडला सेन्सेक्स
SHARES

अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या जबरदस्त घसरणीचा परिणाम आशियातील बाजारांसोबतच भारतीय बाजारावरही पडला. मंगळवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक थोडा थोडका नव्हे, तर तब्बल १२०० अंकांनी गडगडला. तर निफ्टीदेखील ३०० हून अधिक अंकांनी घसरला. इंट्रा डे व्यवहारातील १४ महिन्यांमधील ही सर्वाधिक मोठी घसरण मानली जात आहे.


का घसरला सेन्सेक्स?

अमेरिकन बाजारात सोमवारी ६ वर्षांतील सर्वात मोठी ७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. ही घसरण एवढी मोठी होती की त्यामुळे बाजाराने वर्षभरातील वाढ गमावली. परिणामी शेअर्सची चौफेर विक्री वाढली. या दबावामुळे एस अँड पी ५०० इंडेक्स आणि डाओ जोन्स इंडस्ट्रीयल इंडेक्स ४ टक्क्यांहून अधिक घसरला.

सोमवारी अमेरिकेत बाँड यील्डमध्ये वाढ झाल्याने नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. परिणामी बाँड यील्ड २.८८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. परिणामी डाओ जोन्सने ११७५ अंकांनी घसरण नोंदवत २४,३४६ अंकांची पातळी गाठली. या धक्कादायक परिणामामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी धास्ती घेत आपापला नफा काढून घेण्यास सुरूवात केली. त्यात आशियायी बाजाराचाही समावेश होता. भारतीय बाजारातूनही परकीय गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. त्याची इंट्राडे व्यवहारांना मोठी झळ बसली.

सोबतच अर्थसंकल्पाच्या नकारात्मक झटक्यातून अद्यापही बाजार सावरलेला नाही. खासकरून शेअर बाजारातील उत्पन्नावर लाॅन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच्या घोषणेमुळे गुंतवणूकदार नाराज झाले आहेत. त्याचमुळे १ फेब्रुवारीपासून शेअर बाजारात सातत्याने मोठी घसरण बघायला मिळत आहे.


‘असा’ घसरला शेअर बाजार

तारीखसेन्सेक्सघसरणनिफ्टीघसरण
१ फेब्रुवारी
३५,९०६
-५९
११,०१०
-१०
२ फेब्रुवारी
३५,०६७
-८४०१०,६६७
-२५६
५ फेब्रुवारी
३४,७५७
-३१०१०,६६७
-९४


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा