Advertisement

युनिव्हर्सल स्टाॅक्स एक्स्चेंजला 'सेबी'ची मंजुरी


युनिव्हर्सल स्टाॅक्स एक्स्चेंजला 'सेबी'ची मंजुरी
SHARES

भारतीय भांडवली बाजार नियामक प्राधिकरणा (सेबी)ने नुकत्याच झालेल्या बोर्ड मिटींगमध्ये ‘युनिव्हर्सल स्टाॅक एक्स्चेंज’ला मंजुरी दिली. या मंजुरीमुळे स्टाॅक एक्स्चेंजवर स्टाॅक्स आणि कमोडिटीजची एकत्र ट्रेडिंग करता येणार आहे. हा मोठा निर्णय मानला जात आहे. आॅक्टोबर २०१८ पर्यंत युनिव्हर्सल स्टाॅक एक्स्चेंज अस्तित्वात येऊन कार्यरत होतील, अशी माहिती ‘सेबी’ने दिली आहे.


क्राॅस लिस्टिंग सोपं

युनिव्हर्सल स्टाॅक एक्स्चेंजच्या निर्मितीमुळे एकाचवेळी स्टाॅक्स आणि कमोडिटीजचा व्यवहार करण्यासोबतच क्राॅस लिस्टिंग करणंही सोपं होईल. सेबीच्या बोर्ड मिटींगमध्ये अनेक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. त्यात क्राॅस शेअरहोल्डिंगचा मुद्दा महत्त्वाचा म्हणावा लागेल.


क्राॅस शेअरहोल्डिंग कॅप

सेबी म्युच्युअल फंड्सवर १० टक्के क्राॅस शेअरहोल्डिंग कॅप लावण्याच्या विचारात आहे. या निर्णयाचा परिणाम युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक आफ बडोदा आणि लाईफ इन्श्युरन्स काॅर्पोरेशन अशा म्युच्युअल फंड कंपन्यांचा युटीआयएमएसीत १८.२४ टक्के हिस्सा आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा