Coronavirus cases in Maharashtra: 202Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 13Pimpri Chinchwad: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 7Total Discharged: 34BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

काही तासात ३ लाख कोटी बुडाले

सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी कोसळला.

काही तासात ३ लाख कोटी बुडाले
SHARE

अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम सोमवारी देशातील शेअर बाजारांवर दिसून आला. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही २०० अंकांची मोठी घट नोंदवली. यामुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. निफ्टीमधील मागील ६ महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. 

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यामुळे आशिया शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री होऊन बाजार कोसळले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. सकाळपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चालू असलेली घसरण अखेरपर्यंत कायम राहिली. बीएसईमधील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झाली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ७८७.९८ अंकांनी कोसळून ४०,६७६.६३ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ४०,६१३.९ चा नीचांक गाठला. तर निफ्टी २३३.६० ने घसरून ११,९९३.०५ वर बंद झाला. निफ्टी दिवसभरात ११,९७४.२० पर्यंत खाली आला होता. 

सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २८ शेअर्स कोसळले. तर निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ४८ शेअर्सने घसरण नोंदवली. एसबीआयचा शेअर्स ३ टक्क्याने तर एशियन पेंट्सचा शेअर्स २.५ टक्क्याने घसरला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, मारूत, नेस्ले, टाटा स्टील आदी शेअर्सही कोसळले. २२९ शेअर्सनी वर्षातील नीचांकी स्तर गाठला आहे. 

बँकिंग, तेल-गॅस, वाहन, धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत चालल्याने कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली. ब्रेंट आॅईलचा भाव २ टक्क्याने वाढून ७० डाॅलरच्या वर गेले. साडेतीन महिन्यातील कच्च्या तेलाच्या भावाचा हा उच्चांक आहे. याशिवाय सोन्याचा दरही वाढला आहे. हेही वाचा -

घरबसल्या म्युच्युअल फंडात करा 'अशी' गुंतवणूक

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक
संबंधित विषय
ताज्या बातम्या