Advertisement

सेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका

मागील काही दिवस देशातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गुरूवारी तर या घसरणीने कळस घाटला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला.

सेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका
SHARES

मागील काही दिवस देशातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गुरूवारी तर या घसरणीने कळस घाटला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला. तर निफ्टीनेही ३०० अंकांची मोठी घसरण नोंदवली. यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  

शेअर बाजारातील सर्व प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. कोरोनाने खालावलेली अर्थव्यवस्था, कृषि विधेयकांवरून सुरु असलेलं आंदोलन आणि युरोपात कोरोनाचा प्रकोप याचा परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला.

जागतिक शेअर बाजारात सुरु झालेल्या पडझ़डीचा परिणाम देशातील शेअर बाजारात गुरूवारी सलग तिसऱ्या दिवशी दिसून आला. जगभरातल्या प्रामुख्यानं युरोपियन देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने जगभरातील बाजार कोसळले आहेत. देशातील शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

सेन्सेक्स गुरूवारी ३६५५३ अंकांवर तर निफ्टी १०८०५ अंकांवर बंद झाला.  बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. बँका, वित्तसंस्था, वाहन, स्थावर मालमत्ता, औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, मारुती, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा