Advertisement

सेन्सेक्सचा विक्रम, प्रथमच ५० हजारांची पातळी ओलांडली

गुरूवारी देशातील शेअर बाजारांनी एेतिहासिक वाढ नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारी प्रथमच ५० हजारांची विक्रमी पातळी ओलांडली.

सेन्सेक्सचा विक्रम, प्रथमच ५० हजारांची पातळी ओलांडली
SHARES

गुरूवारी देशातील शेअर बाजारांनी एेतिहासिक वाढ नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारी प्रथमच ५० हजारांची विक्रमी पातळी ओलांडली. अमेरिकेत नवी राष्ट्रपती जो बायडेन यांनी सत्ता हातात घेतल्याचा सकारात्मक परिणाम देशातील शेअर बाजारावरही दिसून येत आहे. 

रिलायन्स, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा आदी शेअर्सच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्सने ५० हजारांची विक्रमी पातळी गाठली.  तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४,७०० पर्यंत गेला आहे. याआधी २३ मे २०१९ रोजी सेन्सेक्सने ४० हजारांचा आकडा गाठला होता. अवघ्या नऊ सत्रांमध्ये सेन्सेक्सने एक हजार अंकाची उसळी घेतली आहे.

 सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा रिलायन्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक यासारख्या बड्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. एस अ‍ॅण्ड पी बीसीएसई मीडकॅप इंडेक्सने ०.६९ टक्क्यांनी किंवा १३२ अंकांनी उसळी घेत १९ हजार २८८ चा टप्पा गाठला. तर बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स ०.६८ टक्के किंवा १२६.८६ अंशांनी वधारला आणि १८ हजार ८७० पर्यंत गेला.

केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत भारतीय शेअर बाजारातील तेजी अशीच कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अर्थसंकल्पात सरकार काय धोरणं आखतं, कुठल्या घोषणा करतं यावरून बाजाराची पुढची दिशा ठऱणार असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा