Advertisement

लागोपाठ दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ३.१२ लाख कोटी


लागोपाठ दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ३.१२ लाख कोटी
SHARES

लागोपाठ दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०१ अंकांनी वाढून ३३,२५० वर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी ९९ अंकांनी वाढून १०,२६५ वर बंद झाला. आॅटो, बँकिंग, एफएमसीजी, फार्मा, रियाल्टी आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाल्याने शेअर बजारात वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांनी ३.१५ लाख कोटी रुपये कमावले आहेत.


मार्केट कॅपमध्ये वाढ

गुरूवारी सेन्सेक्समध्ये ३५२ आणि निफ्टीत १२२ अंकांची वाढ झाली. होती तर शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ३०१ आणि निफ्टीत ९९ अंकांची वाढ झाली. यामुळे बुधवारी बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांची मार्केट कॅप १, ४३, १६, ४१४.६३ कोटी रुपयांवरून शुक्रवारी १, ४६, ३१, ६२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या दोन दिवसांमध्ये मार्केट कॅपमध्ये एकूण ३, १५, २०८.३७ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यानुसार गुंतवणूकदारांनी या दोन दिवसांत एकूण ३.१५ लाख कोटी रुपये कमावले.



कुठले शेअर्स वधारले?

बीएसईतील हेवीवेट शेअर्समध्ये दिवसभरात आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एचयूएल कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टीवरील नोंदणीकृत ५० शेअर्सपैकी ३८ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर पीएसयू बँक, मीडिया इंडेक्समध्ये घसरण दिसून आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा