सेन्सेक्सच्या तेजीला लगाम, 14 अंकांच्या घसरणीसह बंद

  Mumbai
  सेन्सेक्सच्या तेजीला लगाम, 14 अंकांच्या घसरणीसह बंद
  मुंबई  -  

  लागोपाठ चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई शेअर बाजारातील तेजीला अखेर बुधवारी ब्रेक लागला. दिवसाची सुरूवात चांगली होऊनदेखील दिवसअखेर सेन्सेक्स 14 अंकांच्या घसरणीसह 31146 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 3.3 अंकांनी घसरून 9621.25 वर बंद झाला.

  दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स (31255.28) आणि निफ्टी (9649.6) या दोघांनीही सर्वोत्तम दर गाठला होता. मात्र बाजार बंद होण्याच्या काही तास अगोदर शेअर्सची जोरदार विक्री झाल्याने बाजारावरील दबाव वाढला.

  दोन्ही बाजारात घसरण नोंदवण्यात आली असली, तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये चमक दिसली. बीएसई मिडकॅप इंडेक्सने 135.5 अंकांची वाढ नोंदवली. तर निफ्टीच्या मिडकॅप 100 इंडेक्सने 0.6 टक्क्यांची वाढ नोंदवली. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्सही 156 अंकांनी वधारून 15080 वर बंद झाला.

  ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, फार्मा, रिएॅल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, पॉवर, ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा कल होता. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 23425 वर बंद झाला. मात्र निफ्टीचा पीएसयू बँक इंडेक्स 0.2 टक्क्यांनी घसरला. निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये 0.6 टक्के, फार्मा इंडेक्समध्ये 0.4 टक्के आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये 0.25 टक्क्यांची तेजी होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.