Advertisement

सेन्सेक्समधील घसरणीला ब्रेक, ५६८ अंकांनी वधारला

बुधवारी आणि गुरूवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता शेअर बाजारात दिसून आली.

सेन्सेक्समधील घसरणीला ब्रेक, ५६८ अंकांनी वधारला
SHARES

देशातील शेअर बाजारात मागील दोन दिवसांपासून मोठी घसरण होत होती. या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५६८ अंकांनी वधारून ४९ हजार ८.५० वर बंद झाला. तर निफ्टीनेही मोठी वाढ नोंदवली. निफ्टी १८२.४० अंकानी वधारून १४,५०७.३० वर स्थिरावला.

बुधवारी आणि गुरूवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता शेअर बाजारात दिसून आली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लाॅकडाऊन लागण्याची भिती गुंतवणूकदारांमध्ये दिसली. या दोन सत्रात सेन्सेक्स तब्बल १६११.३२ अंशांनी घसराल आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. 

बुधवारी सेन्सेक्स ८७१.१३ अंकांनी तर गुरुवारी  ७४०.१९ अंकानी कोसळला. तर निफ्टी बुधवारी२६५.३५ अंकांची आणि गुरूवारी  २२४.५० अंकांची मोठी घसरण नोंदवली. शुक्रवारी मात्र ही घसरण थांबली. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्समध्ये वाढ नोंदविली गेली. गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये सर्वाधिक खरेदी केली. निफ्टी मेटल निर्देशांक ३.७% आणि ऑटो इंडेक्स १.२ टक्क्यांनी वधारला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा