Advertisement

शेअर बाजारात उलथापालथ, सेन्सेक्स १५०० अंकांने कोसळला

जागतिक शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे देशातील शेअर बाजारात त्सुनामी आल्याचं दिसून आलं. सकाळी ९.१५ मिनिटाने सेन्सेक्स उघडला ते १ हजार अंकांच्या घसरणीनेच.

शेअर बाजारात उलथापालथ, सेन्सेक्स  १५००  अंकांने कोसळला
SHARES

भारतीय शेअर बाजाराची सुरूवात शुक्रवारी प्रचंड पडझडीने झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी तर निफ्टी ३०० अंकानी आपटला.  साडेअकरा वाजताच्या सुमारास सेन्सेक्समधील घसरण १५०० अंकांपर्यंत पोचली. तर निफ्टीनेही ४३० अंकांची घसरण नोंदवली आहे. या पडझडीने बाजारात जवळपास दीड लाख कोटींचा चुराडा झाला.

 जागतिक शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे देशातील शेअर बाजारात त्सुनामी आल्याचं दिसून आलं. सकाळी ९.१५ मिनिटाने सेन्सेक्स उघडला ते 1 हजार अंकांच्या घसरणीनेच.  गुरूवारी सेन्सेक्स ५१ हजार ३९ वर बंद झाला होता. तर शुक्रवारी सेन्सेक्स ५० हजार २५६ वर उघडला. निफ्टीही २८३.४५ अंकांनी घसरून उघडला. 

शेअर बाजारावर जागतिक अर्थव्यवस्थेचे पडसादही दिसून येत असल्यामुळे पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे. आशियामधील सर्वच शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील नॅसडॅकमध्ये घसरण झाल्याने आशियामधील जवळजवळ सर्वच शेअर बाजारांमध्ये आज नकारात्मक सुरुवात झाल्याचे पहायला मिळालं.  

ऑस्ट्रेलियातही शेअर बाजार दोन टक्क्यांनी घसरला. जानेवारी २८ नंतरची ऑस्ट्रेलियन शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. जपानचा शेअर बाजार १.८ टक्क्यांनी गडगडला तर हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्येही १.६९ टक्क्यांची घसरण झाली. नॅसडॅकमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. नॅसडॅकमधील मागील चार महिन्यातील एका दिवसातली सर्वात मोठी घसरण गुरुवारी पहायला मिळाली.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा