Advertisement

जीडीपीच्या वाढत्या अंदाजाने सेन्सेक्स उसळला


जीडीपीच्या वाढत्या अंदाजाने सेन्सेक्स उसळला
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सन २०१७-१८ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करताना मंगळवारी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथ रेट ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला. या अंदाजानंतर भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने २३२.८१ अंकांची वाढ नोंदवत ३६,२८३.२५ चा पल्ला गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६०.७० अंकांनी वधारून ११,१३०.४० पर्यंत मजल मारली.


कशामुळे वधारला शेअर बाजार?

इकाॅनाॅमिक सर्व्हे सादर झाल्यावर सेंटीमेंट्स सुधारून शेअर बाजारातील खरेदी वाढली. सोबतच तिसऱ्या तिमाहीत काॅर्पोरेट्सचे निकाल चांगले राहिल्याने त्याचाही शेअर बाजाराला हातभार लागला.

प्रामुख्याने आयटी आणि आॅटो इंडस्ट्रीतील शेअर्सची चांगली खरेदी झाल्याने या दोन सेगमेंटमधील कंपन्यांचे शेअर्स चांगले वधारले. परिणामी शेअर बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा