Advertisement

शेअर बाजाराचा विक्रम; सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार

शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे.

शेअर बाजाराचा विक्रम; सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार
SHARES

शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८ हजारांच्या पार गेला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला. तर निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी १७,३०० अंकांवर पोहोचला होता.

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील सकारात्कम परिणाम शेअर बाजारावर दिसत आहेत. आशियाई बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. SGX NIFTY आणि DOW FUTURES सध्या उलाढालही योग्य प्रमाणात सुरु आहे.

दुसरीकडे अमेरिकेतही एलअँडपी ५०० आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीत याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा