Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

सेन्सेक्स, निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांना अडीच लाख कोटींचा फटका

वधारून उघडलेले देशातील शेअर बाजार बुधवारी मोठ्या घसरणीने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ९९७.२७ अंकाने घसरून ४३,८२८.१० वर बंद झाला.

सेन्सेक्स, निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांना अडीच लाख कोटींचा फटका
SHARES

वधारून उघडलेले देशातील शेअर बाजार बुधवारी मोठ्या घसरणीने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ९९७.२७ अंकाने घसरून ४३,८२८.१० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही २८७.४५ अंकाने कोसळून १२,८५८.४० वर बंद झाला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल २.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.  

बँकिंग आणि आयटी शेअर्स बुधवारी मोठ्या प्रमाणावर घसरले. निफ्टी आयटी निर्देशांक ३५८ आणि बँकिंग निर्देशांक ५४० अंकांनी खाली आला. बाजारातील घसरणीमुळे बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅपही १७४.८१ लाख लाख कोटी रुपयांवरून १७२.५६ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

बुधवारी अदानी ग्रुपचा शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळला. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ५ टक्के कोसळला. अदानी ट्रान्समिशन शेअर्स ३ टक्के व अदानी गॅस शेअर्स ४ टक्के घसरला. तर अदानी एन्टरप्राइजेसचे शेअर्सही २ टक्के घसरले. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये १ टक्के घट झाली.  तर अदानी पोर्टच्या शेअर्समध्येही 1 टक्के वाढ झाली.

निफ्टीमध्ये अॅक्सिस बँक, कोटक बँक आणि आयशर मोटारचे शेअर्स ३ टक्के घसरले. तर सन फार्मा आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्येही २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. त्याचबरोबर ओएनजीसीचे शेअर्स ६ टक्के वधारले.  गेल आणि अदानी पोर्टमध्येही १ टक्क्यांनी वाढ झाली.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा