सेन्सेक्सच्या इतिहासात 'ह्या' आहेत १० मोठ्या घसरणी

शुक्रवारी सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टीने (nifty) शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवली. सेन्सेक्स तब्बल ३६०० अंकांनी तर निफ्टी ९०० अंकांनी कोसळला. याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारीही सेन्सेक्स ३१०० अंकांनी आपटला होता.

सेन्सेक्सच्या इतिहासात 'ह्या' आहेत १० मोठ्या घसरणी
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजार (Indian stock markets) घसरत ( decline) आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टीने (nifty) शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवली. सेन्सेक्स तब्बल ३६०० अंकांनी तर निफ्टी ९०० अंकांनी कोसळला. याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारीही सेन्सेक्स ३१०० अंकांनी आपटला होता. भारतीय शेअर बाजाराची या दोन दिवसातील ही घसरण एेतिहासिक होती. शुक्रवारच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ११ लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं. याआधीही शेअर बाजारात मोठे भूकंप झाले होते.  आज आम्ही तुम्हाला सेन्सेक्सच्या इतिहासातील १० मोठ्या घसरणीविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली होती. 


१) २४ ऑगस्ट २०१५

सेन्सेक्स १६२४ अंकांनी कोसळला. सेन्सेक्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण होती. जागतिक शेअर बाजार घसरल्याने  आणि डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सेन्सेक्समध्ये ही घसरण नोंदली गेली. या दिवशी गुंतवणूकदारांना ७ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

२)२८ फेब्रुवारी २०२०

सेन्सेक्स १४४७.३७ अंकांनी खाली आला. कोरोना विषाणूमुळे जगभरात आर्थिक मंदीच्या भीतीमुळे ही घट नोंदविण्यात आली. या दिवशी गुंतवणूकदारांचे ६.४ लाख कोटी रुपये बुडाले.

३) २१ जानेवारी २००८

जगभरातील आर्थिक मंदीमुळे सेन्सेक्सने १४०८.३५ अंकांची घसरण नोंदवली. वर्षभर आर्थिक मंदीचा परिणाम राहिला. 

४) १ फेब्रुवारी २०२०

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री सुरू झाली. यामुळे सेन्सेक्स ९८७.९६  अंकांनी खाली आला.

५) २ फेब्रुवारी २०१८

केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्स  गुंतवणुकीवर अधिक कर लावण्याच्या घोषणेमुळे  शेअर बाजार खाली आले. या दिवशी सेन्सेक्स ८३९ अंकाने कोसळला.

६) ११ फेब्रुवारी २०१६

या दिवशी जागतिक स्तरावर वित्तीय क्षेत्राबद्दल भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीने सेन्सेक्स ८०७.०७ अंकांनी आपटला. 

७) ८ जुलै २०१९

वाढत्या रोखीचे संकट आणि घसरलेल्या व्याजदरामुळे सेन्सेक्सने या दिवशी ७९२.८२ अंकांची घसरण नोंदवली.

८) १६ ऑगस्ट २०१३

अमेरिकेने आर्थिक तेजीसाठी प्रोत्साहानात्मक उपाययोजना न केल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सेन्सेक्स ७६९.४१  अंकांनी घसरला.

९) २२ सप्टेंबर २०११

अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे सेन्सेक्स ७०४ अंकांनी खाली आला.

१०) १३ ऑगस्ट २०१९

जागतिक शेअर बाजार कोसळल्याने देशातील शेअर बाजारही कोसळले.   या दिवशी सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी आपटला.हेही वाचा  -

शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्समध्ये ३०८० अंकांची ऐतिहासिक घसरण

कोरोनाची सेन्सेक्सला लागण, तब्बल २४०० अंकांनी आपटला
संबंधित विषय