Advertisement

चांगले रिटर्न्स हवेत? तर पोर्टफोलिओत हवं वैविध्य!

हंगामी गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ बऱ्यापैकी संतुलित ठेवतात ज्याद्वारे संबंधित जोखीम कमी होते तसंच एकूण परतावा वाढतो.

चांगले रिटर्न्स हवेत? तर पोर्टफोलिओत हवं वैविध्य!
SHARES

ट्रेडिंग क्षेत्रात पोर्टफोलिओचं विविधीकरण (things to know about share market portfolio) हा प्रसिद्ध विषयांपैकी एक आहे. असं असलं तरीही विशेषत: नव गुंतवणूकदारांकडून हा दुर्लक्षित विषय आहे. हंगामी गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ बऱ्यापैकी संतुलित ठेवतात ज्याद्वारे संबंधित जोखीम कमी होते तसंच एकूण परतावा वाढतो.

पोर्टफोलिओमध्ये वैविध्य का हवं?

थोडक्यात सांगायचं झाल्यास, बाजार किंवा विविध क्षेत्र एकसारखीच प्रतिक्रिया देत असतात, असं कधीही होत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट भागात वृद्धी होताना दिसत असली किंवा मार्केटमध्ये मोठी वाढ होत असली तरीही काही क्षेत्रांमधील ट्रेंड घसरता असतो. परिस्थिती अगदी उलटही असू शकते. उदाहरणार्थ- सध्याचीच बाजाराची स्थिती पाहू. स्टॉक मार्केटमध्ये मोठी व्हर्चुअल घसरण होत आहे. मागील सलग दोन महिन्यात त्यांचं मूल्य जवळपास एक चतुर्थांशांनी कमी झालं आहे. तर दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरने याच स्थितीत वाढ झाल्याचं दाखवून दिलं आहे. एफएमसीजी सेक्टरलाही ही गोष्ट लागू झाली आहे. त्यामुळे एक चतुर गुंतवणूकदार या नात्याने मार्केट कोसळत असतानाही कमीत कमी नुकसान झेलण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता हवीच. ही लाट भरात असतानाही तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

गुंतवणूक कशी करावी?

आधी हे पक्कं समजून घेऊयात की, पोर्टफोलिओ बांधणी हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी योग्य घटक कोणते आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विविध उद्योग, व्हर्टिकल्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कंपनीचे व्यवस्थापन (प्रमुख भागधारकांसह), मागणी-पुरवठ्याचे पैलू आदी संबंधित घटकांद्वारे बाजार पूर्णपणे समजून घेणं शक्य आहे. हे एखाद्या घड्याळाप्रमाणे एकमेकांच्या संयोगाने काम करतात. तुम्ही जेवढ्या सूक्ष्मरितीने हे समजून घ्याल, तितके अचूक मूल्यांकन करू शकाल.

वैविध्य कसं आणाल?

हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक धोरणांवर अवलंबून असतं. ही विविधता क्षेत्रांबाबत, मार्केट कॅपिटलायझेशन (लार्ज कॅप/मिड कॅप/ स्मॉल कॅप), किंवा गुंतवणूकीची साधने या सर्वांसंबंधी असू शकते. उत्कृष्ट विविधता असलेल्या पोर्टफोलिओमध्ये सिक्युरिटीज (विविध क्षेत्र आणि कंपनीच्या आकारासंबंधी). कमोडिटीज ( सराफा आणि बेस मेटलसह ) आणि चलन या सर्वांचं वैविध्य असतं.  

ध्येय निश्चित करा, नुकसान थांबवा

गुंतवणूक करताना संबंधित ध्येय निश्चित करणं आवश्यक असतं तसंच भावनिक गोष्टींमध्ये अडकून न पडता स्वतःचं नुकसान टाळणंही महत्वाचं असतं. याद्वारे तुम्ही गुंतवणुकीसह बरेच पुढे जाल. अखेरीस आपल्या गुंतवणुकीचा अनोखा प्लॅन, प्राधान्यक्रम आणि जोखिमीची भूक यानुसार विविधीकरण करणं हा पूर्णपणे तुमचा निर्णय असतो. एकाच क्षेत्रातील किंवा इंन्स्ट्रुमेंटमधील मालमत्ता कधीही संकलित करू नका. यामुळे तुमची जोखीम मोठ्या प्रमाणावर वाढते. एक गुंतवणूकदार या नात्याने बाजाराची जेवढी अधिक माहिती तुम्ही ठेवाल, तेवढे चांगले शेअर्स किंवा मालमत्ता तुमच्याकडे असेल. कारण, ज्ञान आणि अंतर्दृष्टी हेच बाजाराचे खरे गेम चेंजर्स असतात.

- संदीप भारद्वाज, मुख्य विक्री अधिकारी, एंजल ब्रोकिंग लिमिटेड


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा