Advertisement

तुम्हाला माहितेय का? पूर्वी २६ जानेवारीला साजरा व्हायचा स्वातंत्र्य दिन


तुम्हाला माहितेय का? पूर्वी २६ जानेवारीला साजरा व्हायचा स्वातंत्र्य दिन
SHARES

६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात तिरंगा फडकावला जात आहे. दिल्लीसोबतच राज्यातही देखावे, रथयात्रा काढल्या जात आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की २६ जानेवारीला केवळ प्रजासत्ताक दिनच नव्हे, तर स्वातंत्र्य दिनही साजरा करण्यात यायचा? होय हे खरं आहे... देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर २६ जानेवारी स्वातंत्र्य दिन अर्थात पूर्ण स्वराज्य दिनाच्या रुपात साजरा व्हायचा.


कारण काय?

सन १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटीश सत्तेकडून पूर्ण स्वराज्य मिळवण्याचा संकल्प केला होता. त्यामुळेच हा दिवस स्वातंत्र्य दिनाच्या रुपात साजरा करण्यात यायचा. मात्र १५ आॅगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा व्हायला लागला.


स्वातंत्र्यासाठी १५ आॅगस्टच का?

लाॅर्ड माऊंटबॅटन यांना वैयक्तिक कारकिर्दीसाठी १५ आॅगस्ट हा दिवस खूप महत्त्वपूर्ण वाटायचा. यामागे कारणही तसं खास होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १५ आॅगस्ट १९४५ रोजी जपानच्या सेनेने माऊंटबॅटन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सेनेसमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी १५ आॅगस्टची निवड केली.


संविधान तयार झालं २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांत

भारतीय संविधान तयार होण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचं नेतृत्व केलं. भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकी बरीच कलमं आता कालबाह्य झाली आहेत. आजपर्यंत संविधानात ११८ दुरूस्ती झाल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यघटनेत ४५९ कलमं आहेत. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालं. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 'जन गन मन' गीताला संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीताच्या रुपात स्वीकारलं होतं. 


गुगलने बनवलं डुडल

गुगलने भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाला डुडलद्वारे मानवंदना दिली. डुडलमध्ये विविध राज्यांच्या सांस्कृतिक समृद्धीला दर्शवण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा