Advertisement

मुंबईत जवानांच्या मदतीसाठी ५ रुपयांत वडापाव

३० जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वडापाव विकण्याचा संकल्प त्यांनी केल आहे. यातली विशेष बाब म्हणजे बाजारात १० ते १५ रूपयांना मिळणारा वडापाव फक्त ५ रूपयांमध्ये विकला जाणार आहे. पण त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे वडापाव विक्रीतून मिळणारी रक्कम ३१ जानेवारीला मुंबईत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ही रक्कम जवानांसाठी दिली जाणार आहे.

मुंबईत जवानांच्या मदतीसाठी ५ रुपयांत वडापाव
SHARES

सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठामपणे उभं राहून लढणारा भारतीय जवान! इतक्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या जवानांना त्यासाठी त्यांची देशभक्ती पुरेशी ठरते. मात्र, या जवानांच्या प्रती वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरातील नागरिक वेगवेगळे उपक्रम करत असतात. असाच एक उपक्रम मुंबईतल्या 'आपला वडापाव'ने केला आहे.

५ रुपयांत 'आपला वडापाव'

३० जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वडापाव विकण्याचा संकल्प त्यांनी केल आहे. यातली विशेष बाब म्हणजे बाजारात १० ते १५ रूपयांना मिळणारा वडापाव फक्त ५ रूपयांमध्ये विकला जाणार आहे. पण त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे वडापाव विक्रीतून मिळणारी रक्कम ३१ जानेवारीला मुंबईत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ही रक्कम जवानांसाठी दिली जाणार आहे.

यामधून एकूण १ लाख रुपये जमा करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. मी मुंबईकरांना आवाहन करतो की त्यांनी इथे भेट देउन वडापाव घ्यावा.

मंगेश अहिवळे, मालक, आपला वडापाव

एल्फिन्स्टनला मिळणार वडापाव

याआधीही मुंबईचा हाच वडापाव अनेकदा मदतीसाठी आला आहे. 'आपला वडापाव'ने असाच एक सामाजिक संदेश देत एल्फिन्स्टनमध्ये मृत पावलेल्या मयुरेश हळदणकरच्या कुटुंबाला ५ रुपयाला वडापाव विकून मदत केली होती. तर यंदा देखील देशाच्या जवानांसाठी ही मदत केली जाणार आहे. ३० जानेवारी रोजी एलफिस्टन येथील सारथी हॉटेलजवळ हा वडापाव विकला जाणार आहे.

हेही वाचा

हा नक्की कितवा प्रजासत्ताक दिन? सरकारी विभागानं केली 'ही' चूक!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा