वटवाघळाला जीवदान

 Kanjurmarg
वटवाघळाला जीवदान
वटवाघळाला जीवदान
वटवाघळाला जीवदान
See all

कांजूरमार्ग - आॅक्टोबर हिटमुळं बेशुद्ध होऊन पडलेल्या एका वटवाघळाचा जीव वाचला आहे. कांजूरमार्गमधील एका सोसायटीत हे वटवाघूळ एका गाडीच्या बॉनेटवर पडलं होतं. रविवारी सायंकाळी कांजूरमार्ग स्टेशनजवळच्या लोढा अॅरूम ग्रँडमधील आॅगस्टा इमारतीत राहणाऱ्या निशांत कशबा यांना त्यांच्या गाडीवर पडलेलं हे वटवाघूळ दिसलं. त्यांच्याकडून याची माहिती मिळताच तिथे पोहचलेल्या कांजूरमार्गमधील प्राणीमित्र हर्षिल सावला आणि परीन शहा यांनी या वटवाघळाला ताब्यात घेत राॅ या प्राणीमित्र संस्थेच्या कार्यालयात नेलं. या वटवाघळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं राॅ प्राणीमित्र संस्थेेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितलं.

Loading Comments