Advertisement

नववर्षातील पहिलं चंद्रग्रहण, आज होणार सुपरमूनचं दर्शन

नववर्षातलं आज पहिलं चंद्रग्रहण आहे. या ग्रहणानंतर १६ जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होईल. २०२१ पर्यंतचे हे शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वीचे पूर्ण चंद्रग्रहण २७ जुलै २०१८मध्ये झालं होतं.

नववर्षातील पहिलं चंद्रग्रहण, आज होणार सुपरमूनचं दर्शन
SHARES

नववर्षातलं आज पहिलं चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 21 मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण आहे. ब्लडमून, सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहणाचा योग एकाच वेळी आला आहे. मात्र खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमून भारतीयांना पाहता नाही येणार. पण संध्याकाळी सुपरमूनचं दर्शन होणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपासून सुपरमूनचं दर्शन भारतीयांना होणार आहे.  

इथं पाहा चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे एकाच रेषेत येतात. हे चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग इथून दिसणार आहे. पण भारतीयांना टीव्ही, युट्युबवरच चंद्रग्रहण पाहाण्याची संधी मिळणार आहे. या ग्रहणानंतर १६ जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होईल. २०२१ पर्यंतचे हे शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वीचे पूर्ण चंद्रग्रहण २७ जुलै २०१८मध्ये झालं होतं.


वर्षातील पहिले चंद्रग्रहण

वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे 'सुपर ब्लड वुल्फ मून या नावानं ओळखलं जातं. ग्रहणाच्या दिवशी चंद्राचा रंग तांब्याप्रमाणे लालसर होतो, म्हणून त्याला 'ब्लड वुल्फ मून' म्हटलं जातं. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधून पास होताना सुर्याची किरणं थेट चंद्रावर पडण्यास अडथळा निर्माण होतो. मात्र पृथ्वीच्या कडातून काही प्रमाणात सुर्यकिरणं चंद्रावर पडतात आणि चंद्र लालसर भासू लागतो. त्यामुळे या चंद्रग्रहणाला 'सुपर ब्लड मून' म्हणतात. पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी सुर्य, पृथ्वी आणि चंद्र बरोबर एका रेषेत येतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्यानं नेहमीपेक्षा जास्त मोठा आणि प्रकाशमान दिसतो.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा