Advertisement

भारतात चंद्रग्रहणाला सुरुवात, 'इथे' पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

हे संपूर्ण चंद्रग्रहण तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पाहू शकता. जाणून घ्या कुठे?

भारतात चंद्रग्रहणाला सुरुवात, 'इथे' पहा लाईव्ह स्ट्रिमिंग
file photo
SHARES

भारतामधून यंदा 2022 सालामधलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 8 नोव्हेंबर दिवशी दिसणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी (Tripurari Purnima) यंदा चंद्रग्रहणाचा योग आला आहे.

दरम्यान 15 दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झाल्यानंतर आता दिवाळीची सांगता करताना कार्तिकी पौर्णिमेलाही चंद्रग्रहण अनुभवता येणार आहे. भारतात प्रामुख्याने हे ग्रहण ईशान्येकडून राज्यात दिसणार आहे. महाराष्ट्रात मात्र या ग्रहणातच चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रग्रहणाचा अदभूत नजारा थेट डोळ्यांनी पाहता येणार आहे.

चंद्रग्रहण दुपारी 2.39 वाजता सुरू झाले आहे. दुपारी 3.47 ते 5.12 या वेळेमध्ये चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती निर्माण होईल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे.

भारतामध्ये पुढील चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 दिवशी पाहता येणार आहेआहे. 

कुठे पहाल चंद्रग्रहण? 

हे संपूर्ण चंद्रग्रहण तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पाहू शकता. अनेक ऑफिशिअल वेबसाइट्स या ग्रहणाचं थेट प्रसारण करणार आहेत. या वेबसाइट्सचे तपशील आम्ही तुम्हाला देत आहोत. TimeandDate.com या वेबसाइटवर तुम्ही पूर्ण चंद्रग्रहणाचे थेट प्रसारण पाहू शकता. या वेबकास्टमध्ये तुम्हाला चंद्रग्रहणाचा बहुतांश भाग पाहता येणार आहे. या वेबसाइट व्यतिरिक्त तुम्ही TimeandDate.com च्या YouTube चॅनेलवर जाऊन देखील चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता.

याशिवाय Virtual Telescope Project या वेबसाईटवरही तुम्ही चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता. तसेच Virtual Telescope Project च्या YouTube चॅनेलवरही तुम्हाला लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.याशिवाय इतरही अनेक वेबसाइट्स चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण करणार आहेत. तुम्ही ग्रिफिथ वेधशाळेच्या YouTube पेजवरही चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता. हे चंद्रग्रहण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. भारतात या चंद्रग्रहणाची (Last Lunar Eclipse 2022) सुरुवात संध्याकाळी 05:29 वाजता होईल आणि संध्याकाळी 06:19 ला संपेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर व्यापणाऱ्या प्रदेशात दिसणार आहे.

New Delhi5.30 PM – 6.18 PM
Gurugram5.33 PM – 6.18 PM
Hyderabad5.44 PM – 6.18 PM
Kolkata4.56 PM – 6.18 PM
Noida5.32 PM – 6.18 PM
Vijapur5.59 PM – 6.18 PM
Lucknow5.20 PM – 6.18 PM
Pune6.01 PM – 6.18 PM
Bhopal5.40 PM – 6.18 PM
Bengaluru5.53 PM – 6.18 PM
Mumbai6.05 PM – 6.18 PM
Ahmedabad6.00 PM – 6.18 PM
Raipur5.25 PM – 6.18 PM
Patna5.05 PM – 6.18 PM
Vapi6.06 PM – 6.18 PM
Chennai5.42 PM – 6.18 PM
Chandigarh5.31 PM – 6.18 PM
Ranchi5.07 PM – 6.18 PM
Kanpur5:23 PM-6:18 PM
Haridwar5:26 PM -6:18 PM
Ujjain5:47 PM-6:18 PM
Panaji6:06 PM – 6:18 PM
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा