अॅसिड हल्ल्यातल्या तरुणींचा 'कॉन्फिडन्स वॉक'


  • अॅसिड हल्ल्यातल्या तरुणींचा 'कॉन्फिडन्स वॉक'
  • अॅसिड हल्ल्यातल्या तरुणींचा 'कॉन्फिडन्स वॉक'
SHARE

मुंबई - महिलांवर होणाऱ्या अॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. अॅसिड हल्ला झाल्यानंतर या मुलींचे जगणे कठिणच होते. उपचारासाठी लागणारा खर्च तसेच कुटुंबियांना सहन करावा लागणारा मनस्ताप याची कल्पनाही करवत नाही. यामध्ये अॅसिड पिडीत तरूणीचे खच्चीकरण तर होते. पण आता अॅसिड हल्ल्यातील पीडित मुलींसाठी राज्य महिला आयोग आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनने पुढाकार घेतलाय. 'कॉन्फिडन्स वॉक' अशा नावाची संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आले.

5 मार्चला वरळी येथे अॅसिड पीडित मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांचे पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अॅसिड हल्ल्यातील पीडितसोबत सेलिब्रेटीही भाग घेणार आहेत.
कॉर्पोरेट सेक्टरमधील कंपन्यांनाही आमंत्रित केले गेले आहे. जेणेकरून अॅसिड पीडित मुलींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या