Advertisement

coronavirus : राज्यातील 'या' मोठ्या मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद

राज्यातील अनेक मंदिरं कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. कुठली आहेत ही मंदिरं वाचा...

coronavirus : राज्यातील 'या' मोठ्या मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद
SHARES

राज्यात कोरोना विषाणूच्या (coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९ च्या घरात गेली आहे. मंगळवारी, मुंबईत (Mumbai) कोरोनामुळे बाधित ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. देशातील हा तिसरा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू दिल्लीत तर दुसरा मृत्यू कर्नाटकामधील कलबर्गी इथं झाला होता.

कोरोना व्हायरसचा कहर लक्षात घेता राज्य सरकारनं ३१ मार्चपर्यंत शाळा महाविद्यालये बंद ठेवली आहेत, तर पर्यटन स्थळेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली आहेत. यामध्ये कुठली मंदिरं (temple) आहेत याचीच माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत.


पुढील आदेशापर्यंत दर्शन बंद

राज्यातील बर्‍याच मोठ्या मंदिरांनीही भाविकांना दर्शनासाठी येण्यास मनाई केली आहे. पुढील आदेशांपर्यंत अनेक मंदिरांनी भाविकांसाठी परमेश्वराचे दर्शन बंद केलं आहे. या मंदिरांमध्ये मुंबईचे सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर पंढरपुरातील मुंबा देवी शिर्डी विठ्ठल मंदिर अशी अनेक मोठी नावं आहेत. मंदिर प्रशासनानुसार, परिस्थिती सामान्य होईपर्यंत भाविकांना मंदिरात येऊन परमेश्वराच्या दर्शनास परवानगी नसेल.

कुठली मंदिरं बंद?

मंगळवारी म्हणजे आज दुपारी तीनपासून शिर्डी साईबाबा मंदिर साई भक्तांसाठी बंद राहणार आहे. साई मंदिर, भोजनालय, भक्ती निवास, ऑनलाइन दर्शन पासही बंद राहणार आहेत. तथापि, संस्थेचे रुग्णालय खुले राहील. पुढील आदेशापर्यंत हीच परिस्थिती राहील.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील दगडूसेठ गणपती मंदिरही मंगळवारी सकाळपासून अनिश्चित काळासाठी बंद आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, हे मंदिर देखील सोमवारी संध्याकाळी ३ वाजल्यापासून भाविकांसाठी बंद आहे.


कधीपर्यंत दर्शन बंद

कोरोना व्हायरसमुळे सिद्धिविनायक मंदिर पहिल्यांदा बंद ठेवण्यात आलं आहे. याआधी कधीच मंदिर बंद ठेवण्यात आलं नव्हतं. वैद्यकिय कक्ष फक्त भक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुण्याचे श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणेश मंदिर १७ मार्चपासून अनिच्छीत काळासाठी बंद करण्यात आलं आहे. उस्मानाबादमधील तुळजा भवानी मंदिरातही भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद राहिल. पंढरपूर इथलं विठ्ठल रुक्मणी मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे.



हेही वाचा

Coronavirus Update: महाराष्ट्रावर Lock Down ची वेळ आलीय?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा