• दान उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARE

जोगेश्वरी - इंडियन ऑइल आणि फँड्री फाऊंडेशनच्या वतीने जोगेश्वरीच्या प्रतापनगरमध्ये दान उत्सव 2016चे आयोजन करण्यात आले. खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या फँड्री फाऊंडेशनला मदत म्हणून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी इंडियन ऑईलच्या मुंबईतील प्रत्येक पेट्रोलपंपवर येणाऱ्या नागरिकांना याची माहिती देत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक आणि शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले. 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मुंबईभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संस्थेच्या स्वयंसेविका प्रणाली चिपळूणकर यांनी दिली. ही मदत खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवांसाठी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या